माणसाच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो असं म्हणतात. आणि यासाठी हवी जिभेवर रेंगाळत राहील अशी चव. हि विशिष्ट चव येते विशिष्ट पद्धतीने बनवलेल्या मसाल्यांनी. आपल्या महाराष्ट्रात तर या मसाल्यांची, पाकक्रियांची खूप विविधता आहे. याच विविधतेने मला भुरळ पाडली आणि जन्म झाला एका मसालेदार प्रवासाचा!
-दत्तात्रय (बाबा) जाधव
संस्थापक, बाबा जाधव मसाले
एका नव्या ब्रॅण्डची जन्मगाथा
ह्या मसालेदार प्रवासाची सुरुवात १९४२ साली झाली, त्याची ही रोचक कथा ! माझे आजोबा ज्ञानोबा जाधव यांना नवनवीन गोष्टी शिकण्याचा छंद होता. यातलाच एक म्हणजे मसाला बनवण्याचा. वेगवेगळे मसाले ते स्वतः तयार करून पाहायचे अन मित्रपरिवार आणि नातेवाईकांना वाटायचे. मित्रपरिवारात हे मसाले भलतेच हिट झाले. म्हणजे इतके, की ग्राहक म्हणत – “नॉन व्हेज खायचं तर बाबा जाधवांच्या मसाल्याचं, नाही तर सरळ भोपळ्याची भाजी खायची“!
घरगुती रूपात, फावल्या वेळात ते हे करायचे. पुढे माझे वडील दत्तात्रय (बाबा) जाधव यांना घरच्या या व्यवसायात गोडी निर्माण झाली. वयाच्या दहाव्या वर्षीच ते ग्राहकांशी बोलायचं कसं, पैशांचा हिशेब चोख कसा ठेवायचा यात तरबेज झाले. कालांतराने त्यांनी हा व्यवसाय वाढवला. घरोघरी जाऊन ते मसाले विकू लागले.
लोकांच्या पसंतीला उतरायचं आणि टिकून राहायचं तर त्यांची आवडनिवड बारकाईने लक्षात घेतली पाहिजे यावर त्यांचा दृढ विश्वास होता. म्हणूनच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात फिरून तिथली खाद्यसंस्कृती त्यांनी जवळून पाहिली, अनुभवली.
तिथल्या चालीरितींचा अभ्यास केला. विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र… प्रत्येक ठिकाणी नॉन व्हेज पदार्थांचा रस्सा किंवा कालवण बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. तसा, घरासाठी मसाले बनवणे हा महिलांचा प्रांत. त्यामुळे त्यांच्याशी बोलून वेगवेगळ्या मसाल्यांमधले घटक, त्यांचं प्रमाण, ते बनवण्याच्या पद्धती हे सारं समजून घेऊन बाबांनी आपल्या अशा खास मसाल्याच्या रेसिपीज बनवल्या. यातून मग वऱ्हाडी धाटणीचे, खान्देशी पद्धतीचे, मालवणी प्रकारातले, कोल्हापुरी स्टाइलचे अश्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतातील मसाले आमच्या प्रॉडक्ट लाईनमध्ये विसावले…
आपला महाराष्ट्र म्हणजे दर तीस कोसावर वेगळी बोलीभाषा कानावर येणारा, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून भर्राट वाहणाऱ्या वाऱ्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अचाट पराक्रमाने पावन झालेला असा देश. कोकणच्या रूपाने तब्बल साडेसातशे किमीचा समुद्रकिनारा लाभलेला हा प्रदेश. इथल्या खाण्यापिण्याच्या सवयीही विशिष्ट अशाच.
साऱ्या भारतात जरी नॉनव्हेज खाल्लं जात असलं तरी आपल्यासारख्या दख्खनच्या पठारावरच्या रांगड्या माणसांना एक खास अशी, राकट अन मर्दानी महाराष्ट्रासारखीच चव हवी असते. बाबांनी त्यांच्या अनुभवातून आणि परिश्रमांच्या बळावर तयार केलेले अस्सल महाराष्ट्रीयन चवीचे मसाले वापरत महाराष्ट्रातील घराघरात पारंपरिक आणि अस्सल पदार्थ बनवले जावेत यासाठी बाबा जाधव मसाले महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध करायचे ठरवले. अन ती त्यांना मिळावी यासाठीच माझ्या आजोबा आणि बाबांनी अथक प्रयत्न केले आणि मग साकारला हा खास महाराष्ट्रीयन चवीचा ठेवा! असा हा आनंदाचा आणि खास चवीचा ठेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठीच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्याची अस्सल चव कायम ठेवू शकेल असं पॅकेजिंग वापरून मी घेऊन येतोय ‘बाबा जाधव मसाले’. आणि ज्याला जोड असते स्वतः बाबा जाधव ह्यांच्या अनुभवी देखरेखीची. मला खात्री आहे हे मसाले प्रत्येक अस्सल मराठी मनावर अनंत काळ राज्य करतील…..
– पवन जाधव
चेअरमन, बाबा जाधव मसाले
The story of a new brand
This interesting journey began way back in 1942. My grandfather Shri. Dyanoba Jadhav was always keen and curious to learn and experiment with new things. One such hobby was spices and blends. He used to blend various spices to make a variety of masalas. He used to distribute these amongst his friends and family. These masalas soon became immensely popular and had loyal followers who said, “If you want to eat non-veg then cook it with Baba Jadhav Masale or then eat vegetables instead”.This journey started right in my house where my grandfather used to create blends during his free time. My father, Dattatray Jadhav who was a child then was also attracted to this business. He was merely 10 years old when he started dealing with customers, handling money matters etc. It was no surprise that he exponentially expanded the business and was selling masales door to door.
Customer satisfaction was always something which he strived for. He studied the nuances of the flavours and made sure that the masalas were liked by everyone. To maintain the authenticity of the taste he himself travelled all over Maharashtra to study the food culture of every region. He travelled to Konkan, Vidarbha, Western Maharashtra etc. to taste the non-vegetarian curry from these areas. He realised that every region has their own specific taste. The kitchen is generally said to be a woman’s domain but my father discussed the ingredients, their proportions etc with these ladies and then created his own unique blend of spices. With his study he created a product line which contained masalas from Khandesh, Warhad, Malvan etc.
Maharashtra is the land of brave Maratha warriors, the bravery and strength reflected in the food as well. Maharashtra is famous for its bold flavours typical to every region right from hot and tangy flavours of the Western Coast to the Fiery spicy taste of Vidarbha. Each region has their unique scrumptious flavour combinations which makes Maharashtrian food a Foodie’s Delight. My father and grandfather wanted these authentic Maharashtrian tastes to reach all over India. Thus, came into existence the Baba Jadhav Masale Brand. We consistently focus on bringing innovation to our processes and products matching the ever-evolving requirements of our consumers.
I am sure that these authentic Maharshtrian flavours will steal everyone’s hearts and will take a place of pride in everyone’s kitchen.
Pavan Jadhav
Chairman, Baba Jadhav Masale
जे अस्सल असतं
ते कायम टिकतं
नातं असो कि ती मूल्य असोत